News Cover Image

76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

डांग सेवा मंडळ नाशिक संचलित,
डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय अभ्यासक्रम विभाग पेठ येथे
🇮🇳  76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.  🇮🇳 
     🌷🌷🌷🌷🌷🌷🌷     पेठ -  दिनांक 26/01/2025 वार रविवार रोजी डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे 76 वा प्रजासत्ताक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री राजेंद्र पाटील उपमुख्याध्यापक श्री.मधुकर मोरे पर्यवेक्षक श्री.दिलीप केला उपप्राचार्य सौ वसुधा आचार्य गावातील प्रतिष्ठित नागरीक सर्व पालक यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री पाटील सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.त्यानंतर उपप्राचार्य सौ आचार्य मॅडम  यांनी स्काऊट गाईड ध्वजाचे ध्वजारोहण केले. विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी पेठ शहरातून प्रभात फेरी काढली.या कार्यक्रमाप्रसंगी मा.प्राचार्य यांनी सर्व विद्यार्थी व पालकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी व पालक उपस्थित होते.