News Cover Image

​​​​​​​व्यक्ती चरित्र चित्रण स्पर्धेत जनता विद्यालय मुल्हेर च्या विद्यार्थ्यांचे यश

व्यक्ती चरित्र चित्रण स्पर्धेत जनता विद्यालय मुल्हेर च्या विद्यार्थ्यांचे यश
    साहित्य प्रसार केंद्र प्रतिष्ठान व डांग सेवा मंडळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने अभोना विद्यालयात वाचन विकास माला या पुस्तकावर आधारित "व्यक्ती चरित्र चित्रण" स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत जनता विद्यालय मुल्हेर येथील 
कुमारी - संघप्रिया राजेंद्र पवार ७वी द्वितीय
कुमार- अर्जुन जगन्नाथ ठाकरे ८वी तृतीय
कुमारी- आलिया फारूक मन्सुरी ८वी उत्तेजनार्थ यांनी यश संपादन केले. विद्यार्थ्यांना विद्यालयातील श्री मोरे डी.पी., श्री पगार एस.के., श्री येवला सी.जी, श्रीमती गायकवाड एम.एल. यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा ताईसाहेब, सचिव सौ.मृणाल ताई जोशी, संचालक श्री अनिल पंडित, प्राचार्य श्री धात्रक एस.सी., पर्यवेक्षक श्री शेख पी.आय. तसेच सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्यात