News Cover Image

डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती साजरी   🌹

डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती साजरी   🌹
  डांग सेवा मंडळ नाशिक संचलित,जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,मुल्हेर येथे  आज बुधवार दिनांक १५/१०/२०२५ रोजी भारताचे माजी राष्ट्रपती,भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य श्री.बोवा एस.एस.,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
       विद्यार्थी मनोगतानंतर श्री. मोरे एस.एस.यांनी विद्यार्थी जीवनातील वाचनाचे महत्व सांगितले.प्राचार्य श्री.बोवा एस.एस.यांनी डॉ अब्दुल कलाम यांच्या जीवनातील विविध प्रसंग सांगून त्यांच्या जीवन कार्याचा परिचय आपल्या अध्यक्षीय मनोगतातून करून दिला.श्री. सुर्यवंशी एम.ए. यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.श्री. अग्निहोत्री एम.बी. यांनी कार्यक्रमाची सांगता केली.

 📖 एक तास वाचणासाठी📖
      या प्रसंगी विद्यार्थ्यांना विविध विषयांवरील पुस्तके देऊन एक तास वाचणासाठी देण्यात आला.