News Cover Image

विठ्ठल नामाची शाळा भरली

🌹विठ्ठल नामाची शाळा भरली 🌹

डांग सेवा मंडळ नाशिक,संचालित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुल्हेर येथे आज शनिवार दिनांक ०५/०७/२०२५  रोजी  आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले*
 श्री.विठ्ठल,रखुमाईच्या, वारकऱ्यांच्या वेशभूशेत विद्यार्थ्यांचे विद्यालयात आगमन झाले.श्री. विठ्ठल,रखुमाईची पालखी सजविण्यात आली.पालखीतील प्रतिमेचे पुजन करण्यात आले.याप्रसंगी डांग सेवा मंडळाचे संचालक श्री.पंडित भाऊसाहेब, विद्यालयाचे प्राचार्य श्री.बोवा सर, पर्यवेक्षक श्री.जाधव सर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 


              विद्यालयातून श्री.उद्धव महाराज समाधी मंदिरापर्यंत दिंडीचा कार्यक्रम श्री.विठ्ठल नामाच्या जयघोशात अतिशय भक्तीमय वातावरणात पार पडला.गावातील शेकडो भक्तांनी पालखीचे पुजन केले.दिंडीदरम्यान वरूनराजानेही हजेरी लावल्याने संपूर्ण वातावरण प्रफुल्लित झाले होते
           *दिंडी श्री.उद्धव महाराज समाधी मंदिरात पोहोचल्यावर तेथे श्री.विठ्ठलाचे भजन करण्यातआलेत.प्रसाद म्हणून विद्यार्थ्यांना केळी देण्यात आल्यात.व भक्तिमय वातावरणात पुन्हा विद्यालयाच्या प्रांगणात दिंडीचा समारोप