News Cover Image

रिमझिम पावसात स्वातंत्र दिन मोठ्या उत्सहात साजरा….

 

    है प्रीत जहाँ की रीत सदा, मैं गीत वहाँ के गाता हूँ l 

   भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ l

रिमझिम पावसात देखील स्वातंत्र दिन मोठ्या उत्सहात साजरा….

                      पावासाची रिमझिम त्यात आपल्या देशाचा स्वातंत्रदिन, पावसाची सकाळपासूनच संथ धार सुरु होती.तरीदेखील विद्यार्थ्यांमधील उत्साह थोडा देखील कमी झालेला  नव्हता . त्याच गगनभेदी  आवाजात विद्यार्थ्यांनी  घोषणा दिल्या . विद्यार्थ्यांचा तो उत्साह  डोळ्याच पारण फेडणारा होता. त्यामुळे स्वतंत्र दिनाचे वातावरण देखिल अतिशय उत्साहवर्धक झाले होते.

 

                      डांग सेवा मंडळ नाशिक संचलीत,जनता विद्यालय मुल्हेर येथे आज १५ ऑगस्ट २०२३ रोजी स्वातंत्रदिन साजरा करण्यात आला. शाळेचे माननीय  श्री.अशोक लक्ष्मण नंदन सरांच्या  हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या वेळी संस्थेचे संचालक मा. श्री. अनिल पंडील (भाऊसाहेब ),गावचे सरपंच व उपसरपंच  श्री. निंबा भानसे  व श्री. योगेश सोनवणे  पोलीस पाटील, मुल्हेर पोलीस स्टेशनचे सहसंचालक श्री. लोहारे साहेब आदिवासी सोसायटी अध्यक्ष व  उपाध्यक्ष  ग्रामस्थ  तसेच शाळेचे शिक्षक व शिक्षकइतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.