जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुल्हेर येथे शालेयस्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न
*डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुल्हेर येथे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा या दृष्टीने शालेय स्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उदघाटन उपसरपंच श्री योगेश सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष शरद कुमार गांगुर्डे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष मनोज अहिरे, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए. सोनवणे, विद्यालयाचे प्राचार्य ए.एल. नंदन सर हे उपस्थित होते. विज्ञानाचे महत्त्व व वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्यासाठी तसेच संशोधन वृत्तीला चालना मिळावी यासाठी हा उपक्रम विद्यालयात राबविण्यात येत असल्याचे नंदन सर यांनी उद्घाटनाच्या वेळी सांगितले. यावेळी पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी एकूण 36 उपकरणांची मांडणी केली होती. यात आरोग्य, दळणवळण, शेती, सौर ऊर्जा आदी विषयांवर आधारित उपकरणांचा समावेश करण्यात आला होता. तसेच वैज्ञानिक रांगोळी प्रदर्शन भरवण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी विविध विज्ञान प्रतिकृती असलेल्या 19 रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील विज्ञान शिक्षक श्री एस. व्ही. जाधव, एस. एस. चौधरी ए. बी. थोरात. ए. टी. पठाडे, एम. बी. अग्निहोत्री, एन.के. जाधव, ए.पी. विसपुते, श्री डी.टी.सोनवणे, श्री एम.एन.गिते, श्रीमती ए.व्ही.सपकाळ, श्रीमती एस.के. शिंपी, श्री जी.एन. बागुल, श्री डी.व्ही. जाधव आदींनी परिश्रम घेतले.