News Cover Image

जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुल्हेर येथे डांग सेवा मंडळाचे माजी सचिव स्व. डॉ. विजयजी बिडकर यांची जयंती साजरी

                        जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुल्हेर येथे डांग सेवा मंडळाचे माजी सचिव स्व. डॉ. विजयजी बिडकर यांची जयंती साजरी मुल्हेर, ता.बागलाण येथिल डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुल्हेर येथे डांग सेवा मंडळ नाशिक संस्थेचे माजी सचिव, आरोग्यदूत, दीनदुबळ्यांचे कैवारी, क्रीडाप्रेमी, निसर्ग प्रेमी, वाचनाचे व्यासंगी, स्वर्गीय डॉ. विजयजी बिडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री धात्रक एस.सी. होते. तर प्रमुख अतिथी म्हणुन संस्थेचे संचालक श्री अनिल पंडित भाऊसाहेब, पर्यवेक्षक श्री पी.आय.शेख हे होते. या प्रसंगी सर्वप्रथम डॉ. साहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी डॉक्टर साहेबांच्या जीवन कार्यावर मनोगत व्यक्त केले. त्यात पुष्पांजली जगताप, विद्या लांडगे, अनन्या सोनवणे, पायल चौरे, पुर्वी चौरे, प्रिया चौरे, हार्दिक राजभोज, अर्णव जाधव, श्रीराज पंडित, अनुष्का भानसे, कल्याणी गायकवाड, तेजस्विनी भोये, आर्यन मराठे, प्रेम पवार, स्वप्निल चौरे, अर्जुन ठाकरे, मोहित बत्तीसे यांनी मनोगत व्यक्त केले. शिक्षकांच्या वतींर श्री डी.बी.येवला, श्री एम.ए.सुर्यवंशी, यांनी डॉ. साहेबांच्या आरोग्य, शैक्षणिक व सामाजिक कार्याचा परिचय करून दिला. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री धात्रक एस.सी. यांनी डॉ. साहेबांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला. डॉ. साहेबांचे विद्यार्थी प्रेम व पेठ येथील विद्यार्थ्यांचा अपघात झाल्यानंतर डॉक्टर साहेबांनी त्या विद्यार्थ्याला वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न याची माहिती दिली.  कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या जयंतीचे औचित्य साधून सर्व विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री चंद्रकांत येवला यांनी केले.