News Cover Image

नाशिक विभागीय क्रीडा स्पर्धेत जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुल्हेरच्या विद्यार्थ्यांचे यश

नाशिक विभागीय क्रीडा स्पर्धेत जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुल्हेरच्या विद्यार्थ्यांचे यश

               नुकत्याच मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल नाशिक येथे  झालेल्या विभागस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुल्हेर च्या विद्यार्थ्यांनी विषेश यश संपादन करून राज्यस्तरीय स्पर्धेत प्रवेश मिळविला.
      यात विद्यालयातील कु. गणेश सुकलाल पवार ( ९वी) गोळाफेक प्रथम, कु.निलेश नानाजी पवार (११वी) बांबूउडी प्रथम, कु.रोहित मोहन भानसे (१२वी) बांबूउडी द्वितीय या तीनही विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच कु.जयमाला दादाजी बर्डे (१२वी) भालाफेक तृतीय, कु.सोनाली वसंत अहिरे (११वी) तिहेरीउडी चतुर्थ क्रमांक मिळविला. या सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयाचे क्रीडाशिक्षक श्री. डी.बी. येवला सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे डांग सेवा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा मा.हेमलता ताई बिडकर, सचिव सौ.मृणालताई जोशी, संचालक श्री अनिल पंडित, प्राचार्य श्री धात्रक एस.सी., पर्यवेक्षक श्री शेख पी.आय. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.