जनता विद्यालय मुल्हेर च्या विद्यार्थ्याचे राज्यस्तरीय स्पर्धेत यश
आज चिपळुण.जि.रत्नागिरी येथे झालेल्या राज्यस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुल्हेर येथील विद्यार्थी निलेश नानाजी पवार(११वी) याने १७वर्षीय वयोगटातील बांबु उडी या खेळ प्रकारात तृतीय क्रमांक पटकावला आहे. सदर खेळाडूला विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री.येवला डी. बी. यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्याचे डांग सेवा मंडळ नाशिक संस्थेचे अध्यक्षा आदरणीय हेमलता ताईसाहेब बिडकर, सचिव सौ. मृणालताई जोशी, संचालक श्री अनिलजी पंडित, प्राचार्य श्री धात्रक एस.सी., पर्यवेक्षक श्री.शेख पी.आय. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच कन्या वसतिगृहाच्या अधिक्षिका सौ.शेवाळकर पी एस., अधिक्षक श्री.पाटील.एस.व्ही. मुल्हेरचे सरपंच श्री निंबा भानसे, उपसरपंच श्री योगेश सोनवणे व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी अभिनदंन करून शुभेच्छा दिल्या
