News Cover Image

जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुल्हेर,येथे कर्मवीर दादासाहेब बिडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुल्हेर,येथे कर्मवीर दादासाहेब बिडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन🙏💐💐🌹🌹🙏


      डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुल्हेर येथे आज गुरुवार दिनांक-१९ मार्च २०२६ रोजी,आदिवासी सेवक, दलित मित्र, डांग सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर दादासाहेब बिडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन   करण्यात आले.प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे संचालक श्री अनिल पंडित भाऊसाहेब उपस्थित होते. दादासाहेबांच्या पुतळ्याचे व प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यालयातील विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले.शिक्षकांच्या वतीने श्री. येवला सी.जी. यांनी मनोगतातून दादासाहेबांना विनम्र अभिवादन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सुर्यवंशी एम. ए.यांनी केले.कार्यक्रमास कन्या वसतिगृहाच्या अधिक्षिका श्रीमती.शेवाळकर मॅडम,विद्यार्थी वसतिगृहाचे अधिक्षक श्री.पाटील सर,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, वसतिगृहाचे विद्यार्थी,विद्यार्थिनी उपस्थित होते.