News Cover Image

भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षा संपन्न

जनता विद्यालय मुल्हेर  येथे भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षा संपन्न
   डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुल्हेर येथे डांग सेवा मंडळ नाशिक व गायत्री परिवार हरिद्वार यांच्या वतीने विद्यार्थ्यांना आपल्या भारतीय संस्कृती ची ओळख व्हावी व सामान्य ज्ञान वाढावे यासाठी इयत्ता ५ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी एकूण १०६८ विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी गायत्री परिवाराचे नाशिक प्रमुख जयंतीभाई पटेल, संस्थेच्या अध्यक्षा हेमलता ताई बिडकर, व गायत्री परिवाराचे मान्यवर  उपस्थित होते. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे प्राचार्य श्री धात्रक एस.सी., पर्यवेक्षक श्री शेख पी.आय., संचालक श्री अनिल पंडित यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सहकार्याने परीक्षा सुरळीत पार पडली.