News Cover Image

जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिन साजरा.

            आज, ६ डिसेंबर भारतीय संविधनाचे जनक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीचा दिवस आहे. देशभरात हा दिवस 'महापरिनिर्वाण दिन' म्हणून साजरा केला जातो. आज 67 वा महापरिनिर्वाण दिन, बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी उपस्थित  होते. शाळेचे मुख्याध्यापक मा .श्री.नंदन सरांनी प्रतिमेला  पुष्पहार अर्पण केला.तसेच संस्थेचे संचालक मा.श्री. पंडित भाऊसाहेब यांनी प्रतिमेचे पूजन करून झाल्यावर  सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी सर्वांनी अभिवादन केले.

‘महापरिनिर्वाण दिना’निमित्त

 

                         दरवर्षी ६ डिसेंबर हा दिवस भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा पुण्यतिथी दिवस म्हणून साजरा केला जातो. .बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन ६ डिसेंबर १९५६ रोजी झाले. बाबासाहेबांची पुण्यतिथी देशभरात 'महापरिनिर्वाण दिन  म्हणून साजरी केली जाते. संविधान निर्माता डॉ. भीमराव रामजी आंबेडकर हे थोर समाजसुधारक आणि अभ्यासक होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य जातिवाद दूर करण्यासाठी तसेच, गरीब, दलित आणि मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी समर्पित केले.आंबेडकरांनी १९५६ साली बौद्ध धर्माचा स्वीकार केला.

                               परिनिर्वाण हे बौद्ध धर्मातील प्रमुख तत्वांपैकी एक तत्त्व आहे. 'परिनिर्वाण' चा अर्थ 'मृत्यूनंतरचे निर्वाण'. बौद्ध धर्मानुसार, जो व्यक्ती निर्वाण प्राप्त करतो तो सांसारिक इच्छा आणि भ्रमांपासून मुक्त होतो.आंबेडकरांची पुण्यतिथी म्हणजेच, महापरिनिर्वाण दिन या दिवशी लोक त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतात. दिवे आणि मेणबत्त्या पेटवून त्यांना श्रद्धांजली वाहून त्यांच्याप्रती आदर व्यक्त करतात. त्यांच्या स्मरणार्थ अनेक ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात.त्यांचे विचार आणि त्यांची संघर्षगाथाही सांगितली जाते.