News Cover Image

जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुल्हेर येथे शाळा प्रवेशोत्सव साजरा..

जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुल्हेर येथे शाळा प्रवेशोत्सव साजरा..
       *डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुल्हेर येथे सन 2023 - 24 या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य अशोक नंदन हे होते. तर प्रमुख मान्यवर म्हणून उपसरपंच योगेश सोनवणे, सोसायटीचे उपसभापती सुरेश अहिरे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष मनोज अहिरे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष शरद गांगुर्डे, व्यवस्थापन समिती सदस्य उमेश दीक्षित, डांग सेवा मंडळाचे संचालक अनिल पंडित हे उपस्थित होते. यावेळी नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास पर्यवेक्षक सुनिल धात्रक व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत येवला यांनी केले.