मुल्हेर विद्यालयातील विद्यार्थिनींनी घडवीले भारतीय संस्कृतीचे दर्शन
मुल्हेर विद्यालयातील विद्यार्थिनींनी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवीत कलश घारण करून, औक्षण करून लेझीम पथकाने सर्वप्रथम पाहुण्यांचे स्वागत केले. ईश्वर स्तवन व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच माता सरस्वती व कर्मवीर दादासाहेब बिडकर व डॉ. विजयजी बिडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुल्हेर तसेच कै.शामलाताई बिडकर इंग्लिश मिडीयम स्कूल मुल्हेरचे वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डांग सेवा मंडळ संस्थेच्याअध्यक्षा श्रीमती हेमलताताई बिडकर होत्या. प्रमुख अतिथी संस्थेचे उपाध्यक्ष दामू काका ठाकरे, संचालक श्रीकृष्ण चंद्रात्रे, अरविंद देशपांडे, अनिल पंडित, मुल्हेरचे सरपंच निंबा भानसे, सुनील गवळी, काशिनाथ गवळी, नवनाथ रसाळ उपस्थित होते.
प्रास्ताविक प्राचार्य ए.एल. नंदन यांनी केले. यावेळी संस्थेचे जेष्ठ संचालक श्रीकृष्ण चंद्रात्रे सर यांनी विद्यालयतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आल्याचे नमूद केले.