News Cover Image

जनता विद्यालय मुल्हेर येथे मोफत इंग्रजी व्याकरण व संभाषण कौशल्य शिबिर संपन्न

 जनता विद्यालय मुल्हेर येथे मोफत इंग्रजी व्याकरण व संभाषण कौशल्य शिबिर संपन्न
 
डांग सेवा मंडळ नाशिक,संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,मुल्हेर व श्री. उद्धवेश युवा व बाल संस्कार केंद्र मुल्हेर यांच्या संयुक्त विद्यमाने 5 दिवसीय मूलभूत इंग्रजी व्याकरण, संभाषण व संवाद कौशल्य शिबिर संपन्न झाले.
      या शिबिराच्या समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी जनता विद्यालयाचे प्राचार्य श्री ए एल नंदन सर हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.ए. सोनवणे, डांग सेवा मंडळाचे संचालक श्री अनिल पंडित भाऊसाहेब, श्री उद्धव महाराज संस्थानाचे प्रमुख किशोर महाराज पंडित, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री शरद गांगुर्डे, व्यापारी दत्ताशेठ येवला, नरेंद्र कोठावदे, संस्कार केंद्राचे गणेश गर्गे, भारत सरकार औषधी नियंत्रक अधिकारी श्री नितिन जाधव हे होते. या 5 दिवसीय शिबिरात मा.श्री.सुनीलजी आयवळे सर(सेवानिवृत्त शिक्षक,ठाणे) प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. ग्रामीण भागातील विद्यार्थी इंग्रजी विषयाच्या भीतीने शिक्षणापासून दुरावतात. त्यांच्या मनातील भीती कमी करून त्यांचे बेसिक इंग्रजी व ग्रामर पक्के करून त्यांना स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी तयार करणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून श्री आयवळे सर नेहमी इंग्रजी विषयाच्या मोफत कार्यशाळा घेत असतात. त्यांनी रोज सहा तास असे आपल्या पाच दिवसांच्या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना परिपूर्ण इंग्रजी व्याकरण व संभाषण कौशल्य विकसित करण्यासाठी मोफत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांचा विद्यालयाचे प्राचार्य श्री नंदन सर यांनी शाल श्रीफळ देऊन सन्मान केला. तसेच संस्कार केंद्राच्या वतीने श्री नितीन जाधव व चंद्रकांत येवला यांनी त्यांना सन्मान चिन्ह, शाल श्रीफळ देऊन सन्मानित केले. कार्यशाळेतील आपले अनुभव श्री सुनील पंडित, सावरी पंडित, हर्षदा बागुल, सोनाली बागुल यांनी व्यक्त केले. तर निपुण अग्निहोत्री, लोकेश येवला, प्रचिती गर्गे, अंकिता पंडित, नैतिक येवला, किरण येवला, यांनी इंग्रजी भाषेतून संभाषण करून कार्यशाळेतील अनुभव व्यक्त केलेत. कार्यशाळेस सहावीच्या विद्यार्थ्या पासून ते , साठ वर्षांच्या व्यक्ती पर्यंत सर्व स्तरातील नागरिकांनी सहभाग घेतला. याप्रसंगी शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रकांत येवला यांनी तर सूत्र संचालन श्री. महेंद्र सुर्यवंशी सरांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी श्री.मच्छिंद्र पिंगळे, देविदास सुर्यवंशी, नरेंद्र चौधरी, केदारनाथ बागुल, सागर अहिरे, हेमलता जोशी, संकेत कुलकर्णी यांनी विशेष परिश्रम घेतले.