News Cover Image

जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुल्हेर येथे शालेयस्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले

जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुल्हेर येथे शालेयस्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले

            

            डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुल्हेर येथे शालेयस्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले. प्रदर्शनाचे उदघाटन शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री मनोज अहिरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री ए.एल.नंदन हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक श्री सुनिल धात्रक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सोनू भानसे, नरेंद्र कोठावदे, मयुरी गर्गे, माया येवला, कविता दुसाने, संगीता दुसाने, योगिता मोरे, शोभा घटमाळ, श्रीकांत पंडित, दिपाली बोरसे, वैशाली बोरसे, श्रीकांत पाटील, निखिल बागुल, सुनिता पाटील, कल्याणी येवला, दुर्गा येवला, संतोष घटमाळ, धिरेन बागुल हे उपस्थित होते. प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विज्ञान शिक्षक श्री एस.व्ही. जाधव यांनी प्रास्ताविक केले व सी. जी. येवला सर यांनी सूत्रसंचालन केले. प्रदर्शनात एकूण ६५ उपकरण मांडण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पना शक्तीला चालना देऊन अतिशय सुंदर व उपयुक्त उपकरणे तयार केली होती.  तसेच वैज्ञानिक रांगोळी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

         ५वी ते ८वी गटात प्रथम क्रमांक - पूरग्रस्त क्षेत्रासाठी तरंगते घर (राघव येवला ६वी), द्वितीय क्रमांक - स्मार्ट सिटी (दर्शन अहिरे, हर्षल गांगुर्डे ७वी), तृतीय क्रमांक - पवन चक्की (तनिष्क पाटील, गितेश चौधरी ६वी), उत्तेजनार्थ - नाविन्यपूर्ण उपकरण तोफ (अर्जुन ठाकरे),

           तसेच ९वी ते १२वी गटात प्रथम क्रमांक - फायर अलार्म (गौरी शुक्ल, प्राजक्ता मेश्राम १०वी), द्वितीय क्रमांक - भूकंप सूचक यंत्र (लोकेश येवला १०वी), तृतीय क्रमांक - स्मार्ट पेट्रोलपंप (मितीका जगताप, हर्षदा घटमाळ १०वी), उत्तेजनार्थ - सोलर सिष्टिम (हर्षदा बागुल, सावरी पंडित १०वी) यांनी मिळविला. प्रदर्शन बघण्यासाठी गावातील मान्यवर व पालक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विज्ञान विभाग प्रमुख श्री एस.एस.चौधरी, ए. टी. पठाडे, श्रीमती अर्चना सपकाळ, श्रीमती निलिमा गवांदे, श्री मुकुंद गिते यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.