५० व्या बागलाण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात जनता विद्यालय मुल्हेरच्या उपकरणाला प्राथमिक गटात द्वितीय क्रमांक आज कर्मवीर भाऊराव पाटील आसखेडा येथे झालेल्या ५०व्या बागलाण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुल्हेर येथील उपकरण 'स्पीड ब्रेकर पासून विजनिर्मिती' या उपकरणाचा द्वितीय क्रमांक आला आहे. या विद्यार्थ्यांना नाशिक चे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्री प्रविण पाटील, बागलाण च्या गटशिक्षणाधिकारी श्रीमती चित्रा देवरे मॅडम यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. हे उपकरण कु. राघव चंद्रकांत येवला व कु.दर्शन संजय अहिरे या विद्यार्थ्यांनी बनविले होते. यासाठी विज्ञान शिक्षक श्री जाधव एस.व्ही., श्री चौधरी एस.एस., श्री एम.एन.गिते यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे डांग सेवा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती हेमलताताई बिडकर, उपाध्यक्ष श्री दामू काका ठाकरे, सचिव सौ.मृणालताई जोशी, संचालक श्री अनिल पंडित, विद्यालयाचे प्राचार्य श्री.नंदन ए.एल., पर्यवेक्षक श्री. धात्रक एस.सी. सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.
