News Cover Image

जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुल्हेर येथे स्काऊट गाईड चे हिवाळी शिबीर संपन्न

जनता विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय मुल्हेर येथे स्काऊट गाईड चे हिवाळी शिबीर संपन्न

         डांग सेवा मंडळ संचलित जनता विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयाचे स्काऊट गाईड चे हिवाळी शिबिर कपार भवानी माता परिसर जामोटी येथे संपन्न झाला. यावेळी तेथे स्काऊट गाईड च्या ध्वजाचे ध्वजारोहण स्काऊट चा गट प्रमुख विद्यार्थी चिन्मय बागुल याच्या हस्ते करण्यात आले. स्काऊट चे नियम तत्व यांची माहिती प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना दिली. यानंतर परिसरात श्रमदान करून परिसर स्वच्छता करण्यात आली. विद्यार्थ्यांनी स्वतः स्वयंपाक करून विविध पदार्थ तयार केलेत. त्यातून त्यांना जंगल परिसरात जाऊन आपण कशा रीतीने काम करु शकतो याची जाणीव विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष झाली. विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर केले.