जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुल्हेर येथे वॉटर फिल्टर प्लांट चे उदघाटन
मुल्हेर तालुका बागलाण येथिल डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे ब्लु क्रॉस लॅबरोटरी नाशिक यांच्या सौजन्याने तयार करण्यात आलेल्या जल शुद्धीकरण केंद्राचे उदघाटन ब्लु क्रॉस लॅबरोटरी चे जनरल मॅनेजर मा.संजिव माऊली यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डांग सेवा मंडळाच्या अध्यक्षा मा.हेमलताताई बिडकर ह्या होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे संचालक अनिल पंडित, कॉन्ट्रॅक्टर संजय पाटील, गांगुर्डे, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सोनवणे, जनता विद्यालयाचे प्राचार्य ए.एल.नंदन, पर्यवेक्षक सुनिल धात्रक हे उपस्थित होते.
यावेळी प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. ब्लु क्रॉस लॅबरोटरी चे जनरल मॅनेजर संजीव माऊली यांच्या हस्ते वॉटर फिल्टर प्लांट चे उदघाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून त्यांना शुद्ध पाणी गरजेचे आहे यासाठीच कंपनीच्या फंडातून विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी या जलशुद्धीकरण संचाची उभारणी करण्यात आली असल्याचे मा. संजिव माऊली यांनी बोलतांना सांगितले. आपले आरोग्य चांगले राहवे यासाठी शुद्ध पाणी गरजेचे आहे. विविध प्रदूषणामुळे वेगवेगळे आजार निर्माण होतात व त्यामुळे आपली कार्यक्षमता कमी होते. आपल्या सर्वांच्या हितासाठी या वॉटर प्युरीफायर ची निर्मिती करण्यात आली असून सर्वांनी त्याचा योग्य वापर करावा असे आवाहन कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती हेमलता ताई बिडकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपास्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत येवला यांनी तर आभार प्रदर्शन महेंद्र सूर्यवंशी यांनी केले.